गाव ! काय असतो वो गाव ?

सुट्टीत  शहरातुन गावाकडे गेलो कि असे वाटायचे नको ती गर्दी, नको तो ताण गावातच राहुन घ्यावं, कायमचं! पण घरातले सतत म्हणायचे, “तु शहरातच नोकरी कर, आपल्या गावाकडं पाऊस पाणी येळेवर नाय पडत, शेती साठी जीत पाणी नाय आणि तसं बी गावाकडं असल्यावर कुणी पोरगी बी देत नाय.”

हे पण वाचा: आनंद मिळवण्यासाठी ५ गोष्टी

गाव

शाळा, कॉलेज जशी संपली तसा गावातुन शहरात गेलो मग ते उच्च शिक्षणासाठी असो वा नोकरीसाठी.

शहरातल्या उंचच उंच इमारती, अनेक गल्ली बोळा, रस्त्यांची गर्दी आणि त्यावर वाहनांची तुफान गर्दी अश्या ह्या गर्दीत गावची नाळ कधी तुटली! कळलेच नाही.

सुट्टीत  शहरातुन गावाकडे गेलो कि असे वाटायचे नको ती गर्दी, नको तो ताण गावातच राहुन घ्यावं, कायमचं! पण घरातले सतत म्हणायचे, “तु शहरातच नोकरी कर, आपल्या गावाकडं पाऊस पाणी येळेवर नाय पडत, शेती साठी जीत पाणी नाय आणि तसं बी गावाकडं असल्यावर कुणी पोरगी बी देत नाय.” गावाकडं पावसाचे चार महिने सोडले तर काम पण नसायचं , झाला जास्त कमी पाऊस तरच एकाद दुसरं पीक यायचे. मग काय सुट्टी संपली कि पुन्हा शहराची वाट पकडायला लागायची.

कालांतराने लग्न झाले, मुल बाळ झाली, नोकरी पण बरी हाय, मस्त पैकी घर पण आहे. वर्षातुन एखाद दुसऱ्या सणाला जाण होत गावाकडं आणि तसही मोबाईल वरुन गावाकडची सगळ्यांची खुशाली पण भेटते, त्यामुळे जास्त काही प्रसंग येत नाही गावाकडं जायचा. पोरांची शाळा, माझी नोकरी आता सगळं कसं अंगवळणी पडलं, आता उंचच उंच इमारतींची भीती वाटत नाही, आता रस्त्यांवरची  गर्दी आणि वाहनांच्या तुफान गर्दीतुन वाट सहज मिळते, आता बस किंवा ट्रेन मध्ये बसायला जागा नाही भेटली तरी कुणाकडे तक्रार नाही, आता नोकरीवर पण गप गुमान काम करायची सवय लागली, आता सुट्टीच्या दिवशीही घरी नाही कारण बायको पोरांना फिरुन आणयच असत आणि ह्या सगळ्या गडबडीत गावाकडे जायचंच माणुस विसरुनच जातो.

Corona Virus

पण आता कस झालाय, एखाद मोठं वादळ यावं आणि होत नव्हतं सगळं घेऊन जावं, ह्या वादळात प्रत्येक जण जीव वाचवण्यासाठी गावाकडे पळतोय, कुणी पायी चालत निघालाय तर कोणी टँकर मधे बसुन निघालाय, शहरातलं घर, नोकरी, पोरांची शिक्षण सगळं सोडुन आज लोक गावाकडं जाऊन बसलेत आणि हो हे वादळ दुसरे तिसरं काही नसुन तो एक डोळ्यांना न दिसणारा जीवाणु आहे, “कोरोना” (Covid-19).

गावाला आल्यावर सगळं कस निवांत. मनाला येईल तेव्हा झोपेतुन उठायचं, वाटली तर आंघोळ करायची नाही तर तसाच राहायच, ना बस पकडायची घाई ना ट्रेन, ना नोकरीला वेळेवर जायची घाई, ना पोरांच्या शाळेची घाई, ना चांगलं दिसण्याची घाई, ना गॅस संपायची चिंता ना भाजीला आणायची चिंता, सगळं कस निवांत. मग त्यात एखाद दुसरा बालपणीचा मित्र भेटतो मग त्याच्याबरोबर जुन्या आठवणींना उजाळा देत बसायचं. शहरामध्ये तुम्ही कितीही मोठ्या ५ स्टार, ३ स्टार हॉटेल मधे जेवा पण शेतातल्या बांधावर बसुन जेवायची मजाच काही ओर असते. शहरात कितीही मोठ्या आलिशान गाडीत बसुन फिरा, पण बैलगाडीत फिरण्याची मजाच काही ओर असते. शहरात कितीही मोठ्या घरात राहा, पण गावाकडच्या झोपडीची मजाच काही ओर असते, शहरात कितीही खा पिझ्झा, बर्गर पण गावातल्या चटणी भाकरीची मजाच काही ओर असते, शहरात किती पण वेळ AC त राहा पण गावाकडच्या मोकळ्या हवेची मजाच काही ओर असते.

हे पण वाचा: मुलगी काय असते वो…

आता गावाकडं बघुन वाटत कि गावानं पण चांगली प्रगती केली, कारण गेल्या १५ – २० वर्षात गावाला कधी जवळुन पाहिलंच नाही. आता गावातली जुनी वेस पाडुन तिथं नवी वेस उभी राहिली, गावातल्या मंदिरांचा पण कायापालट झालाय, गावातले रस्ते पण बऱ्यापैकी सुधरलेत, गावात प्रत्येकाच्या दारासमोर दोन चाकी गाडी आहे, काही ठिकाणी तर चार चाकी सुद्धा आहे.

गावातल्या माणसांना आजही तुमच्या बद्दल आपुलकी आहे, जिव्हाळा आहे. शहरात कितीपण पैशाची साठवण केली तरी शेवटी गावाचीच आठवण येते, कारण गाव तो गावच त्याला शहराची सर नाही येणार.

हे पण वाचा: आनंद मिळवण्यासाठी ५ गोष्टी

Suchandra Karle

Suchandra Karle is Sr. Software Engineer. Working in Software Company. He is having more than seven years of experience. Other than work he have hobby to write a blog and trading and playing computer games.

One thought on “गाव ! काय असतो वो गाव ?

 1. Have you ever considered about including a little bit more
  than just your articles? I mean, what you say is valuable and everything.
  However think about if you added some great pictures or videos to give your posts more, “pop”!
  Your content is excellent but with images and videos, this site could certainly be one of the most beneficial in its field.
  Excellent blog!

  P.S. If you have a minute, would love your
  feedback on my new website re-design. You can find it by searching
  for “royal cbd” – no sweat if you can’t.

  Keep up the good work!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top